Wed, May 27, 2020 03:07होमपेज › National › भाजप कार्यकर्त्यांनी एकवेळचे जेवण त्यागावे

भाजप कार्यकर्त्यांनी एकवेळचे जेवण त्यागावे

Last Updated: Apr 07 2020 12:13AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन काळात अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अशात भाजप कार्यकर्त्यांनी एकवेळचे जेवण त्यागून नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचे आवाहन भाजपच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. 

सामाजिक अंतर ठेवत प्रत्येक कार्यकर्त्याने गरजूंची मदत करीत, कोरोनाविरोधातील या संघर्षात पंतप्रधानांचे हात बळकट करावेत, असेही नड्डा म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने 40 नागरिकांना पीएम केअर निधीत 100 रुपयांचे अनुदान जमा करण्याची विनंती करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. यंदा कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच पक्षनेत्यांनी क्वारंटाईन राहून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन टाळले आहे. परंतु, संसर्गाविरोधातील लढ्यात एकत्रित काम करण्याचा संकल्प वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानी भारत माता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, तसेच पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रमितेला पुष्पांजली अर्पण करीत वर्धापन दिन साजरा केला.

भाजपच्या वर्धापनदिनी नड्डांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

 कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर बाळगत घरात, कार्यालयात पक्षाचा नवीन झेंडा फडकावा.
 घरातच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पापर्ण करावे.
 फिडनिडी कार्यक्रमांतर्गत गरजूंना खाद्य पॅकेट वितरित करावे.
 प्रत्येक बूथमधील नागरिकांना मास्क देण्याची व्यवस्था करावी.
 भाजपचा 40 वा वर्धापनदिन असल्याने पीएम केअर फंडात 40 लोकांकडून किमान 100 रुपयांचे अनुदान मिळवावे.
 प्रत्येकाने बूथमधील 40 घरांशी संपर्क साधून किमान पाच धन्यवाद पत्रांवर त्यांची स्वाक्षरी घाव्यी.
 पक्ष तसेच नेत्यांबद्दल असलेल्या विचारांचे वाचन करावे.