Sat, Oct 24, 2020 22:33होमपेज › National › CAA विरोधी आंदोलन, हिंसाचारासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

CAA विरोधी आंदोलन, हिंसाचारासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार

Last Updated: Sep 22 2020 11:10PM
नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलन आणि उत्तर-पूर्व दिल्लीत घडलेला हिंसाचार, यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला होता. आप आणि काँग्रेसचे माजी नगरसेवकांसह अन्य लोकांना हा पैसा पुरविला होता, असे दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्रात म्हटले आहे. 

सीएएविरोधी आंदोलन आणि त्यानंतर दिल्लीत झालेला हिंसाचार याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्थिक देवाणघेवाणीविषयक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन, काँग्रेसची माजी नगरसेविका इशरत जहां, जामिया मिलिया एल्युमनाय असोसिएशन अध्यक्ष शिफा इर रहेमान आणि जामिया मिलियाचे विद्यार्थी मीनर हैदर यांना आंदोलनस्थळी सर्व प्रकारची व्यवस्था करणे आणि दिल्ली दंगलीचा कट आखणे यासाठी 1.61 कोटी रुपये दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. या लोकांना बँक खात्यात हस्तांतरण आणि रोख रकमेच्या माध्यमातून हे पैसे दिले आहेत. 

त्यापैकी 1 कोटी 48 लाख 1 हजार 186 कोटी रूपये आंदोलनस्थळी खर्च केल्याचेही सांगण्यात आले आहे. हिंसक कारवाया करून केंद्र सरकारला सीएए मागे घेण्यास भाग पाडणे, असे या लोकांचे मनसुबे होते, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याचा कालावधी निश्‍चित केला होता. त्याचप्रमाणे हे दहशतवादी कृत्य होते, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

 "