Mon, Aug 03, 2020 15:11होमपेज › National › दुर्धर आजारांवर केंद्र देणार १५ लाखांपर्यंत मदत

दुर्धर आजारांवर केंद्र देणार १५ लाखांपर्यंत मदत

Last Updated: Jan 15 2020 1:57AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्यविषयक सेवांबद्दलचा एक मसुदा तयार केला असून केंद्र सरकार त्यानुसार दुर्धर आजार झालेल्या व्यक्‍तींना उपचारासाठी 15 लाखांपर्यंत  मदत करणार आहे. ही मदत करण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची एक यादी तयार केली जाईल आणि त्यापैकी दुर्धर आजारी रुग्णांसाठी 15 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची तजवीज करण्यात येईल. 

आरोग्य मंत्रालयाने या मसुद्याबद्दल 10 जानेवारीपर्यंत सूचना मागवल्या होत्या. आयुष्यमान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. 50 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा व्हावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे.