Mon, Aug 10, 2020 08:25होमपेज › National › सोशल मीडियावर मास्क परोठ्याचा धुमाकूळ

सोशल मीडियावर मास्क परोठ्याचा धुमाकूळ

Last Updated: Jul 09 2020 3:03PM
मदुराई : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोनाबाधिताचा आकड्याने ७ लाखांचा टप्पा पार पडला आहे. जगभर कोरोनाचे सावट पसरल्याने मनुष्याच्या जीवनाचा जीवरक्षक बनलेला फेस मास्क अविभाज्य घटक बनला आहे. जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत तसेच जनजागृती केली जात आहे. पण ही जनजागृती कोणी कशापद्धतीने करेल हे सांगता येत नाही. तामिळनाडूतील एका व्यक्तीने खाण्याच्या एका चविष्ट पदार्थाद्वारे कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याची भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. 

तामिळनाडूमधील मदुराई इथे एका हॉटेलमध्ये मास्क पराठा तयार केला जात आहे. सध्या या मास्क पराठ्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क महत्त्वाचे आहे. तरीदेखील अनेकजण बेजबाबदारपणे वागतात. अशावेळी समाजात जागरूकता वाढावी या उद्देशाने मास्कच्या आकाराचा पराठा तयार करण्यात येत असल्याचे मॅनेजर पुवालिंगम यांनी सांगितले आहे. 

एखादी गोष्ट चर्चेत आली की त्याची छाप लगेच नावांमध्ये आणि अन्न पदार्थांवर दिसू लागते. कोरोनादेखील त्याला अपवाद नाही याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे.