Tue, Sep 22, 2020 09:32होमपेज › National › मंगळयानानं टिपलं सर्वांत मोठ्या चंद्राचे छायाचित्र

मंगळयानानं टिपलं सर्वांत मोठ्या चंद्राचे छायाचित्र

Last Updated: Jul 04 2020 10:43AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनच्या मार्स कलर कॅमऱ्याने (एमसीसी) १ जुलैला मंगळाच्या सर्वात जवळच्या आणि सर्वात मोठ्या चंद्राच्या फोबोसची छायाचित्रे टिपली आहेत. जेव्हा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळ ग्रहापासून ७२०० किलोमीटरवर आणि फोबोसहून ४२०० किमीवर दूर होतं, तेव्हा ही छायाचित्रे घेण्यात आली. छायाचित्राचे स्पाशिअल रिझोल्युशन २१० मीटर आहे. हे एक ६ MCC फ्रेमपासून बनवण्यात आलेले संयुक्त छायाचित्र असून, यातील रंगदेखील योग्य दिसत आहेत. 

फोबोसच्या छायाचित्रामध्ये टक्कर होण्याच्या खुणादेखील दिसल्या आहेत. चंद्राच्या फोबोसवर स्टिकनीसह श्लोकोव्स्की, रोच आणि ग्रिलड्रिग यासारखे खड्डेदेखील दिसले आहेत. 


 

 "