हरियाणात 65 टक्के मतदान

Last Updated: Oct 21 2019 8:08PM
Responsive image

Responsive image

पानिपत : पुढारी ऑनलाईन 

हरियाणा विधानसभेसाठी सोमवारी अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 65 राहिली. जिल्हानिहाय यमुनानगरमध्ये सर्वाधिक मतदान 69.35 टक्के, तर  गुडगावमध्ये सर्वात कमी 50 टक्के मतदान झाले.

रोहतक जिल्ह्यातील जसिया या गावातील माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर गोळीबार झाला. जसिया येथील पवन नावाच्या व्यक्‍तीवर गोळ्या झाडल्या गेल्या. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला. रोहतकमध्येच भाजपच्या एका नगरसेवकाला एक युवक व त्याच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

मेवातमध्ये चार ठिकाणी हिंसक घटना घडल्या. डोंडल, मल्हाका, सलंबा आणि घासेडा गावांत दोन पक्षांच्या समर्थकांमध्ये तुफान दगडफेक झाली. लाठ्या-काठ्याही चालल्या. अनेक लोक जखमी झालेले असून, त्यांना रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहे. कैथल मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

फिरोजपूर झिरकातील मल्हाका गावात काँग्रेस नेते मम्मन खान आणि भाजप नेते नसीम अहमद यांचे समर्थक परस्परांना भिडले. इथेही दगडफेक झाली. डुमरखा गावात बोगस मतदानावरून वाद झाला. दुष्यंत चौटाला यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला. काही वेळ मतदान थांबवण्यात आले. मोठा पोलिस फौजफाटा पोहोचल्यानंतरच पूर्ववत मतदान सुरू होऊ शकले. अनेक ठिकाणी मतदान यंत्रांतही अडचणी उद्भवल्या.

हरियाणा निवडणुकीत यंदा 1160 उमेदवार आहेत. गत निवडणुकीच्या तुुलनेत 182 उमेदवार कमी आहेत. भाजप आणि काँग्रेसने सर्व 90 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. जननायक जनता पक्षाने 89 जागांवर उमेदवार दिले आहेत. 1 कोटी 83 लाख 90 हजार 525 मतदार आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

चौदाव्या विधानसभेसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुख्यमंत्री खट्टर आणि सर्व 10 खासदारांची कसोटी पणाला लागलेली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांसाठीही हे आव्हान आहे. खट्टर यांनी भाजपसाठी 75 हून अधिक जागांवर विजयाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने 47 जागा जिंकल्या होत्या; पण नंतर लोकसभा निवडणुकीत सर्व दहा जागा भाजपने जिंकल्या. माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते भूपेंद्रसिंह हुडा यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

आमदारांच्या दबावापोटी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांना बाजूला सारून कुमारी शैलजा यांना हे पद दिले. शैलजा यांनी स्वत: कुठेही उमेदवारी केलेली नाही, जेणेकरून सर्वत्र व्यूहरचनेसाठी वेळ मिळावा. हुड्डा मात्र उमेदवारही आहेत. दुसरीकडे दुष्यंतसिंह चौटाला यांच्या जननायक पक्षानेही आव्हान उभे केलेले आहे. माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांच्या कुटुंबातील राजकीय विघटनानंतर दुष्यंत चौटाला यांच्या रूपात नव्याने उदयाला आलेल्या जननायक पक्षासाठी ही पहिली निवडणूक आहे.  हरियाणात किती तरी वेळा सत्तेत राहिलेल्या इंडियन नॅशनल लोकदलासाठीही ही निवडणूक अग्‍निपरीक्षा आहे. ओमप्रकाश चौटाला यांचे उत्तराधिकारी अभयसिंह चौटाला यांच्यासमोर पक्षाला संकटाबाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे. अर्थात, या पक्षाला शिरोमणी अकाली दलाचा (बादल) पाठिंबा आहे. अभयसिंह यांनी अनेक मतदारसंघांतून निवडणुकीची समीकरणे बदलून टाकलेली असल्याचे मानले जात आहे.

16 मतदारसंघांकडे विशेष लक्ष

सर्वच मतदारसंघांतून काट्याची लढत आहे; पण जागा राज्यातील सर्वाधिक हॉट सीट मानल्या जात आहेत. या जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठाही आणि भवितव्यही पणाला लागलेले आहे. भाजपचे उमेदवार तसेच मुख्यमंत्री खट्टर (कर्नाल), प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला (टोहाना, फतेहाबाद), शिक्षण मंत्री रामविलास शर्मा (महेंद्रगड), आरोग्य मंत्री अनिल विज (अंबाला कँट), अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू (नारनौंद), राज्यमंत्री मनीष ग्रोवर (रोहतक) काँग्रेसचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा (सापला किलोई), राष्ट्रीय माध्यम प्रभारी तसेच माजी मंत्री रणदीप सुरजेवाला (कैथल), माजी मंत्री किरण चौधरी (तोशाम), कुलदीप विष्णोई (आदमपूर), इंडियन नॅशनल लोकदलाचे अभयसिंह चौटाला (ऐलनाबाद), तसेच जननायक जनता पक्षाचे संयोजक दुष्यंत चौटाला (उचाला), त्यांच्या मातोश्री नैना चौटाला (बाढडा) सर्वांसमोर विजयाचे आव्हान आहे. बाढडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र रणवीर महेंद्रा हेही निवडणूक लढवत आहेत. दादरीतून आंतरराष्ट्रीय पहेलवान ‘दंगल’फेम बबिता फोगट या निवडणूक लढवत आहेत. कुरुक्षेत्रातील पिहोवातून भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधारसंदीप सिंह हे भाजपतर्फे लढत आहेत.
 

टीम ‘जो बायडेन’मध्ये भारतीय वंशाचे २० जण


जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष; कमला हॅरीस उपराष्ट्राध्यक्ष


धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण ः शरद पवार म्हणाले, 'धनंजय मुडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर माझा मूळीच विश्वास नाही'


IPL 2021: संजू सॅमसन ‘राजस्थान रॉयल्स’चा कर्णधार


'एमपीएससी'च्या याचिकेमुळे संताप! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


शेतकरी आंदोलन : केंद्राची लवचिक भूमिका; शेती सुधारणा कायदे २ वर्षापर्यंत स्थगित ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव!


मराठा आरक्षणावर राज्य सरकार टोलवाटोलवी : आ.शिवेंद्रराजे भोसले यांचा घणाघाती आरोप


हिंगोली : डिग्रसवाणी गावात वंचितने दिला फाॅरेन रिटर्न पीएचडी स्काॅलर उमेदवार अन् आख्खं पॅनेलच गावानं निवडून दिलं


सातारा : वादग्रस्त दगडी खाण अखेर झाली सील


अच्छा चलतै हे हम! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले