Sat, Jul 11, 2020 09:47होमपेज › National › ‘बीएसएफ’च्या आणखी ५३ जवानांना कोरोना

‘बीएसएफ’च्या आणखी ५३ जवानांना कोरोना

Last Updated: Jun 30 2020 5:10PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या आणखी ५३ जवानांना मागील २४ तासांत कोरोनाचे संक्रमण झाले आहे. एकूण ३५४ जवानांवर उपचार सुरू असल्याचे बीएसएफकडून मंगळवारी सांगण्यात आले. आतापर्यंत ६५९ जवानांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मात्र आतापर्यंत ३ लाख ३४ हजार ८२२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. २९ जून रोजीच्या आकडेवारीनुसार देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने सोमवारी तपासण्यात आले होते. मागील चोवीस तासांत कोरोनाने ४१८ लोकांचा बळी घेतला होता. तर नव्याने १८ हजार ५२२ रुग्ण आढळले आहेत. देशभरातील बाधितांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे.