Sun, Oct 25, 2020 08:19होमपेज › National › देशात २४ तासांत ४८२ जणांचा मृत्यू 

देशात २४ तासांत ४८२ जणांचा मृत्यू 

Last Updated: Jul 08 2020 10:54AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे २२ हजार ७५२ नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या ७ लाख ४२ हजार ४१७ एवढी आहे. यामध्ये २ लाख ६४ हजार ९४४ सक्रिय रूग्ण आहेत. तर ४ लाख ५६ हजार ८३१ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत २० हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. 

काल ७ जुलैपर्यंत एकूण १,०४,७३,७७१ सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. यातील २,६२,६७९ सँपल टेस्ट काल करण्यात आले आहे, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. 

यूएसमध्ये ३ दशलक्षहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह 

कोरोनाने जगातील बाधित रूग्णांचा आकडा १.२० कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जगात कोविड-१९ बाधितांची संख्या ११,९५४,९४२ झाली आहे. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ५,४६,७२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६,९०२,३५८ आहे. 

अमेरिकेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३,०९७,०८४ इतकी झाली आहे. तर १३३,९२७ लोकांचा बळी गेला आहे. जगातील जवळपास २१३ देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमेरिकेनंतर, कोरोना रूग्णांची सर्वाधिक संख्या ब्राझिल, भारत आणि रशियामध्ये आहे.

 "