Thu, Nov 26, 2020 20:22होमपेज › National › देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46 हजार रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46 हजार रुग्ण

Last Updated: Nov 21 2020 9:17PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण दररोज वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 46 हजार 232 नवीन रुग्ण आढळले असून संक्रमित लोकांची संख्या 90 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी असल्याची दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 84 लाखांपेक्षा जास्त आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनामुळे 564 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 लाख, 50 हजार, 598 वर पोहोचली आहे. तर कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या 84 लाख, 78 हजार, 124 झाली आहे. गेल्या 24 तासांत 49 हजार 715 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 39 हजार 747 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 32 हजार 726 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबरपर्यंत 13 कोटी 6 लाख,57 हजार, 808 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शुक्रवारी 10 लाख, 66 हजार, 22 कोरोना चाचण्या केल्या आहेत.