Mon, Aug 03, 2020 15:29होमपेज › National › निर्भया प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

निर्भया प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

Last Updated: Jan 14 2020 3:33PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

निर्भया प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात दोषींनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी झाली. यामध्ये दोघांच्याही फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे सर्वांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात पाच सदस्यिय खंडपीठापुढे सुनावणी झाला. यावेळी सर्वच न्यायमूर्तींनी एकमताने याचिका फेटाळून लावली. याचिकेत कोणताही दम नसल्याचे यावेळी सर्वांनीच नमुद केले. विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी याबाबत फेरविचार याचिका दाखल केली होती. सर्वच न्यायमूर्तींनी एकत्र बसून यावर विचार करुन फेरविचार याचिका एकमताने फेटाळली.

दुसरीकडे आजच्या सुनावणीमध्ये फेरविचार याचिका फेटाळली जाईल अशी आशा निर्भयाचा आईने व्यक्त केली होती. 

कोर्टामध्ये सर्व आरोप सिद्ध होऊन दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेची अंमलबजावणी २२ जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यातच या शिक्षेची प्रक्रिया थांबवण्यासाठीच केवळ ही याचिका दाखल केल्याची भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली. याबाबतची याचिका आज फेटाळली जाईल अशी आशा निर्भयाचा आईने व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी २२ तारखेला निर्णयानुसार होईल आणि आपल्याला न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

निर्भया प्रकरणी चारही दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारीही सुरू आहे. त्यासाठी दोरखंड तयार करणे. तसेच त्या दोरखंडांची ताकद तपासण्यासाठी वाळूच्या  पिशव्या वापरून रंगीत तालिम करणे या सर्ब बाबी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यातच फेरविचार याचिका दाखल झाल्याने यावर कोर्ट काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले होते. आता निर्णय आल्याने फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.