Wed, Sep 23, 2020 02:19होमपेज › National › राज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत

राज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत

Last Updated: Jul 01 2020 4:49PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रातील ३८ टक्के (६४ हजार ७०१) रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत. तर, ६ हजार ७७ रुग्णांमध्ये (४ टक्के) संसर्गाची लक्षणे आढळली होती. राज्यातील २ टक्के रुग्ण (२,२५०) अती गंभीरावस्थेत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

आणखी वाचा : दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने बचावला मुलगा! आजोबा ठार

आतापर्यंत महाराष्ट्रातील ९० हजार ९११ (५२ टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ७,६१० रुग्णांचा (४ टक्के) आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यातील १ हजार ९५१ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात ५ लाख ७८ हजार ३३ नागरिक घरगुती विलगिकरणात, तर ३८ हजार ८६६ रुग्ण संस्थात्मक विलगिकरणात आहेत. 

राजधानीत हजारो खाटा रिक्त 

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांसाठीच्या हजारो खाटा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती विलगिकरणात राहुनच मोठ्याप्रमाणात कोरोनाग्रस्त बरे होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये १३ हजार ६६१ खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील  ७ हजार ७४९ खाटा अद्यापही रिक्त आहे. कोरोना केअर सेंटरमधील ७ हजार ८८६ पैकी ६ हजार १८३, तर कोरोना आरोग्य केंद्रातील ५४४ पैकी ३११ खाटा रिक्त आहेत. १६ हजार २४० नागरिक घरगुती विलगिकरणातच राहून उपचार घेत आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.  

आणखी वाचा : राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात, केजरीवालांचा दावा

 "