Sat, Oct 31, 2020 13:52होमपेज › National › केरळ विमान अपघात; मृतांमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह

केरळ विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Aug 08 2020 2:28PM
 कोझिकोड: पुढारी ऑनलाईन

केरळमधील कोझिकोड विमानतळावर शुक्रवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. दुबईहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवर उतरताना घसरले आणि ३५ फूट खोल दरीत कोसळले. या अपघातामध्ये  दोन वैमानिकांसह १८ जणांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेवर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अपघातातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. मरण पावलेल्या १८ प्रवाशांपैकी दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. 

एका इंग्रजी वृत्तानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानात १९१ प्रवासी होते. यात १२८ पुरुष, ४६ महिला, ११ बालके तसेच ७ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. प्रवाशांपैकी १२७ जण जखमी तर १५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अपघात घडला कसा? 

पावसामुळे विमान घसरल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी 7.38 वाजता विमान धावपट्टीवर उतरत असताना मुसळधार पाऊस सुरू होता. धावपट्टीला विमानाची चाके भिडली तसे विमान घसरले आणि 30 फूट खोल दरीत जाऊन पडले.

या दुर्घटनेत २ वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. १२७ लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. 

 "