होमपेज › National › #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर, ट्विटरवरही मानाचा मुजरा

#ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर, ट्विटरवरही मानाचा मुजरा

Last Updated: Feb 19 2020 10:21AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

‘रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, हेच आम्हाला माणिक-मोती, दुसरी दौलत नाही...’, अशा भावनेने रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांचा जयंती सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या शिवजयंतीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातील गल्लोगल्लीत दिसत नाही तर हा उत्साह सोशल मीडियावरही दिसत आहे. आज सकाळपासूनच ट्विटरवर भारतातील ट्रेंडिगवर असलेल्या हॅशटॅगमध्ये #ShivajiMaharaj टॉप ट्रेंडवर आहे.सकाळी 10 वाजेपर्यंत 15 हजारपेक्षा जास्त ट्विट्स हा हॅशटॅग वापरून केले आहेत.

शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत. शिवजयंतीच हाच उत्साह सकाळपासून सोशल मीडियावरही पहायला मिळत आहे. ट्विटरवर #ShivajiMaharaj हा हॅशटॅग सकाळपासून भारतात टॉप ट्रेंडवर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील लोकही हा हॅशटॅग वापरुन ट्विट्स करत आहेत. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काही काळ दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. पण,  आता #ShivJayanti या हॅशटॅगने त्याला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. या हॅशटॅग वापरुन जवळपास 10 हजार ट्विट्स झाले आहेत. त्या खालोखाल #शिवजयंती हा मराठीतील हॅशटॅग जोरात सुरु आहे. हा हॅशटॅग वापरुन जवळपास 5 हजार ट्विट्स झाले आहेत.

लाल महालावरील शिवाजी महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक

शिवरायांच्या तलवारीची नावे..तुळजा अन् भवानी

ट्विटरवर सकाळी 10 वाजेपर्यंत भारतात जे पहिले तीन टॉप ट्रेंड आहेत ते सर्व शिवजयंतीचेच आहेत. शिवप्रेमींप्रमाणेच देशभरातील मान्यवर लोकं शिवजयंती निमित्त ट्विट करत आहेत. त्यामुळे आज दिवसभर ट्विटरवर भारतात शिवजी महाराजच टॉप ट्रेंडवर असतील याच शंका नाही.