पुलवामात चकमक; १ दहशतवादी ठार, १ जवान शहीद

Last Updated: Aug 12 2020 9:49AM
Responsive image


श्रीनगर : पुढारी वृत्तसेवा

जम्मू- कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कामराझीपुरा येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी घडली आहे. 

कामराझीपुरा येथे दोन दहशवादी लपले असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या तुकडीस मिळाली होती. दरम्यान, भारतीय जवानांनी एका सफरचंदाच्या बागेमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेरले. यावेळी दोन्ही बाजूकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळी हँड ग्रेनेड, युद्धजन्य साहित्य आढळून आले आहे. या चकमकी दरम्यान एक जवान जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी श्रीनगर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक जवान जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.