Tue, Aug 04, 2020 14:13होमपेज › Nashik › टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या' 

टिकटॉक बंदीनंतर 'तो' म्हणाला, 'माझ्या दोन्ही बायका लय रडल्या' 

Last Updated: Jul 03 2020 4:42PM
धुळे : पुढारी ऑनलाईन 

केंद्र सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर टिकटॉकवरील असंख्य युजर्सना त्याचा फटका बसला आहे. हे युजर्स स्वत:चे वेगवेगळे व्हिडिओ करून अमाप प्रसिध्दी, लोकप्रियता मिळवली. अशाच युजर्सपैकी एक दिनेश पवार आहे. धुळ्यातील साक्री गावाजवळील दिनेश पवार हा त्याच्या दोन पत्नींसह टिकटॉकवर व्हिडिओ करायचा. त्यामुळे तो टिकटॉक स्टार बनला होता. परंतु, टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली पाहा.

 

दिनेश पवार आणि त्याच्या दोन पत्नी बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे ते टिकटॉक स्टार बनले. त्याचबरोबर, त्यांनी ३० लाकांची कमाई केल्याचेही समोर आले होते. एका वृत्तपत्राशी बोलताना दिनेश म्हणाले, 'टिकटॉक झाल्यानंतर आम्ही आता उद्धवस्त झालो. परंतु, केवळ अशा परिस्थिती आमचीच नसून आमच्यासारखे लाखो लोकांनाही दु:ख झालं असणार, हे आम्हाला समजलं. जेव्हा माझ्या दोन्ही पत्नींना ही बातमी समजली तेव्हा त्या रडूच लागल्या. आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.'

३० लाखांची कमाई केली 

दिनेशने टिकटॉक व्हिडिओतून पैसे कमावल्याचे नाकारले. परंतु, आपल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली, असे तो म्हणाला. मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटूंब आदिवासी भागात राहतात. दिनेशचे एका महिलेसोबत लग्न झाले होते. त्यानंतर दिनेशला दुसऱ्या महिलेवर प्रेम झाले. दुसऱ्या पत्नीलाही त्याने घरी आणले. पहिल्या पत्नीची दुसऱ्या पत्नीला घरी आणण्यास परवानगी होती. 

(video - Bhaiyyaji twitter वरून साभार)