Wed, May 22, 2019 21:02होमपेज › Nashik › शेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही : भुजबळ(व्हिडिओ)

शेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही : भुजबळ(व्हिडिओ)

Published On: Jun 14 2018 3:01PM | Last Updated: Jun 14 2018 3:27PMसिडको (जि. नाशिक) :  प्रतिनिधी 

आमच्यावर अन्याय झालेला असताना कारागृहातून सुटण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस, समता परिषद यासह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते  तसेच महाराष्ट्रातील जनतेने केलेले आंदोलने , मोचॅ काढल्याने आम्ही भुजबळ कुटुंबीय हे उपकार शेवटच्या श्वासापर्यत विसरणार नाही. असे प्रतिपादन राष्‍ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लॅड्रींग प्रकरणात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची अडीच वर्षानंतर जामीनावर सुटका झाली. या नंतर काल छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ आज(दि. १४ जून) नाशिक दौऱ्यावर आले त्या वेळी पाथर्डी फाटा येथे फटाकयांची आतषबाजी, ढोल  तांशांच्या गजरात त्‍यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी मनोगत व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, ‘‘आम्ही कारागृहात असताना आमची सुटका व्हावी यासाठी नाशकात निघालेला लाखोंचा मोर्चा मी विसरणार नाही. आम्ही विकासकामे केली, मध्यतरांच्या काळात अडथळे आले, काही अपूर्ण राहीले, अश्या प्रकारची विकास कामे आगामी काळात पूर्ण करणार आहे. तसेच भविष्यकाळात पुढील वाटचालीसाठी तुमच्या शक्तीचे बल भुजबळ कुटुंबींयाना मिळेल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आ. पंकज भुजबळ, बाळासाहेब कर्डक, गजानन शेलार, राजेंद्र महाले, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती शिवाजी चुंभळे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, अमोल नाईक, सदाशीव नाईक, अमोल महाले, सोमनाथ बोऱ्हाडे, छबु नागरे, मुत्कार शेख, बाळासाहेब गिते, तानाजी गवळी,  योगेश दराडे, मुकेश शेवाळे, धोंडीराम आव्हाड, योगेश कमोद, हरिश महाजन सह कार्यकर्ते उपस्थित होते.