Fri, Sep 18, 2020 18:44होमपेज › Nashik › नाशिकच्‍या 'त्‍या' शेतकर्‍याचे व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणकडून कौतुक!

नाशिकच्‍या 'त्‍या' शेतकर्‍याचे व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणकडून कौतुक!

Last Updated: Mar 30 2020 10:39AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

जगासह भारताला देखील कोरोनाचा विळखा पडला आहे. देशाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनाच्‍या लढाईत बाहेर पडण्‍यासाठी प्रत्‍येक जण काहींना काही मदत करत आहे. सर्वसामान्‍यांपासून सेलेब्‍सपर्यंत सर्वजण देशाच्‍या वाईट काळात मदतीचा हात देवून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. माजी क्रिकेटर व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा शेतकरी गरजूंना धान्‍य दान करणार आहे. विशेष म्‍हणजे हा शेतकरी महाराष्‍ट्रातील नाशिकमधील आहे. 

मदत ही खुल्‍यामनाने केली जाते मग ती केवढी का असेना देश कोरोनाची लढाई लढत आहे.अशावेळी विविध क्षेत्रातील मान्‍यवरांना देखील देशाला यातून बाहेर काढण्‍यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. अशातच लक्ष्‍मणने सोशल मीडियावर एका शेतकर्‍याचा फोटो शेअर करत म्‍हटले आहे की, नाशिकमधील दत्ता राम पाटील या शेतकर्‍याला तीन एकर जमीन आहे. त्‍यापैकी एक एकर जमनीत पिकणारे धान्‍य दत्ता राम पाटील हे गरजूंना देण्‍याचा निर्णय घेतला आहे. 

व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणने पुढे म्‍हटले आहे की, दत्ता पाटील आर्थिकदृष्‍ट्‍या सक्षम नाहीत मात्र देश आज संकटात आहे. अशावेळी जर आपण एक भाखरी खात असेल तर त्‍यातील अर्धी भाकरी माणुसकीच्‍या नात्‍याने गरजूंना देणे आपले कर्तव्‍य आहे. हाच निरपेक्ष भाव ठेवून त्‍यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणार्‍या अशा लोकांना माझा सलाम!

कोरोनापासून बचाव म्‍हणून देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वेच्‍छेने मदत करण्‍याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

►कोरोनाविरुद्ध एकत्र राहा; कठीण काळाचा सामना करा : सुनील छेत्री 

►शाहरुख खानच्या बचावासाठी चाहते मैदानात!

►डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला सर्वांत मोठा इशारा!

►देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला! 

 "