Mon, Nov 18, 2019 08:50होमपेज › Nashik › नंदुरबारमध्ये मतदान स्लीप वाटपात गाेंधळ

नंदुरबारमध्ये मतदान स्लीप वाटपात गाेंधळ

Published On: Apr 29 2019 10:29AM | Last Updated: Apr 29 2019 10:30AM
नंदुरबार : प्रतिनिधी 

जिल्ह्यात सर्वत्र  मागील दोन दिवसापेक्षा आज तापमान थोडे कमी असले तरी सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्साह जेमतेम दिसून आला. अशातच असंख्य मतदारांपर्यंत मतदान स्लिप पोहोचली नसल्याचे आज उघड झाले. नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, या सर्व तालुक्यात हे चित्र दिसून आले आहे. मतदान केंद्राच्या बाहेर स्लीपच्या शोधात घुटमळणारे आणि यादीत नाव सापडत नाही म्हणून गोंधळले मतदार मोठ्या संख्येने दिसत आहेत. नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात फक्त 7.13 टक्के मतदान झाले. 

भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट के.सी. पाडवी यांच्यात प्रमुख लढत असून एकूण अकरा उमेदवार रिंगणात आहेत. डॉक्टर हिना गावित यांनी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान डी. आर. हायस्कूल नंदुरबार मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची भगिनी डॉक्टर सुप्रिया गावित त्यांनीही मतदान केले. सर्वत्र शांततेत मतदान चालू आहे.