Fri, Jun 05, 2020 16:54
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाशिक शहरामध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच

नाशिक शहरामध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच

Published On: Aug 27 2019 12:18PM | Last Updated: Aug 27 2019 12:17PM
इंदिरानगर : वार्ताहर

नाशिक शहरामध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहे. आकाश आरंभ सोसायटी पांडव नगरी येथे अज्ञात व्यक्तीने दोन दुचाकी जाळल्या प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 27 रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अजय मोरेश्वर उपासने (राहणार आकाश आरंभ सोसायटी पांडव नगरी) यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी एम. एच. १५ व्हीजे ७५४० स्प्लेंडर व एम. एच. १५ बीझेड ५१५७ स्कुटी पेप या दोन दुचाकी अज्ञात इसमाने जाळल्या. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.