Wed, Jun 03, 2020 21:13होमपेज › Nashik › जळगावात स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी 

जळगावात स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी 

Published On: Apr 04 2019 12:33PM | Last Updated: Apr 04 2019 12:52PM
जळगाव : प्रतिनिधी

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आधी जाहीर केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द केली आहे. भाजपकडून आता आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्‍यात आले आहे. सध्‍या उन्‍मेष पाटील आणि भाजपचे कार्यकर्ते जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्‍थित असून दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज भरणार असल्‍याची माहिती आहे. 

भाजपकडून उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म देण्‍यात आला आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाची पहिल्यापासून संभ्रमाची स्थिती असल्‍याचे चित्र होते. ऐनवेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यांच्या नावाला विरोध झाल्याचे समजते. यानंतर अखेर आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

अधिक वाचा : उन्मेष पाटील यांना जळगावमध्ये उमेदवारी?

भाजपच्या या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात टक्कर होणार आहे.