Tue, Nov 19, 2019 06:48होमपेज › Nashik › धुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन 

धुळे कारागृहात बॉम्‍ब; अज्ञाताकडून फोन 

Published On: Jan 17 2019 9:03PM | Last Updated: Jan 17 2019 9:03PM
धुळे : प्रतिनिधी 

धुळे येथील कारागृहात बॉम्ब फेकणार असल्याची अफवा पसरविणारा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली. पण तीन तास तपासणी करून कोणतीही वस्तू आढळून आली नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

धुळे येथील पोलिस नियंत्रण कक्षाला औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षा कडून फोन आला. यात अज्ञात व्यक्तीने औरंगाबाद नियंत्रण कक्षाला धुळे कारागृहात बाँब असल्याची माहिती दिल्याचा संदर्भ देण्यात आला. त्यामुळे धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी, उपनिरिक्षक सिद्धार्थ इंगळे, भरत मोरे, मैनुद्दीन सय्यद, यांच्यासह बॉम्ब शोध पथक तसेच श्वान पथक कारागृहात पोहोचले. यावेळी कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना माहिती दिली.

यावेळी पथकाने कारागृहातील सर्व भागाची कसून तपासणी केली. पण 3 तास तपासणी करूनही ही केवळ अफवा असल्याचे स्पष्‍ट झाले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह आवारात बंदोबस्त लावण्यात आला आहे. आता पोलिस औरंगाबाद येथील नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती देणाऱ्याचा शोध घेत आहे.