Fri, Jun 05, 2020 15:06
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › 'युती होणार, २२० हून अधिक जागा जिंकू'

'युती होणार, २२० हून अधिक जागा जिंकू'

Published On: Sep 22 2019 8:51PM | Last Updated: Sep 22 2019 8:51PM

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेधुळे : प्रतिनिधी 

राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकत्र विधानसभा निवडणूक लढणार असून युतीच्या 225 पेक्षा जास्त जागा येणार असल्याची केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात दिली. धुळ्यात राम पॅलेसमध्ये पत्रकार परिषदेत खासदार सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावळ, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व बबन चौधरी, यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री दानवे म्हणाले की, राज्यात 95 हजार बूथ आहेत. यात बुथनिहाय मेळावे घेण्यात येत आहेत. राज्यात भाजप व शिवसेना युती राहणार असून ही निवडणूक सोबत लढण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवसात चर्चा करण्यात येणार आहे. 

एकीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असून काँग्रेस व राष्ट्रवादीला अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. या दोन्ही पक्षांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. भाजप कार्यकर्ते विचाराबरोबर बांधील आहेत, पण काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्ती बरोबर बांधील राहिले. त्यामुळे व्यक्ती सोबत कार्यकर्ते देखील संपले. काँग्रेसने विकासाकडे लक्ष दिले नाही. भाजपने राज्यात मेट्रोचे जाळे पसरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून भारतात गुंतवणूकदार आणले. यातील 35 टक्के गुंतवणूक राज्यात झाल्याचे रावते म्हणाले.