Tue, May 26, 2020 10:55होमपेज › Nashik › लासलगावमध्ये तीघांना सर्प दंश; दोघांचा मृत्‍यू

लासलगावमध्ये तीघांना सर्प दंश; दोघांचा मृत्‍यू

Published On: Aug 17 2019 7:33PM | Last Updated: Aug 17 2019 7:33PM
लासलगाव : वार्ताहर

गेल्या चार दिवसात लासलगावमध्ये तीन जणांना सर्प दंश झाल्‍याची घटना समोर आली आहे. यातील एकाला वाचवण्यात यश आले असले तरी, दुर्देवाने  दोघांचा मृत्‍यू झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाच वर्षाचा वेदांत येवला तालुक्यातील पारेगाव येथून निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील मरळगोई येथे समाधान जगताप या आपल्‍या मामाच्या गावी आई समवेत आला होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घराजवळ तो मामाच्या मुलांसमवेत खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्‍या सापाने अचानक वेदांतच्या उजव्या पायाला दंश केला. यावेळी त्‍याला रक्‍त येउन वेदना व्हायला सुरूवात झाली. 

यावेळी वेदांतने रडत जात आईला काटा टोचल्‍याचे सांगितले. वेदांतची आई जयश्रीने त्‍याचा पाय पाहिला असता, पायातून रक्‍त येत असून, पाय हिरवा पडत असल्‍याच त्‍यांना दिसले. जयश्री यांनी त्‍यांचे वडिल अण्णासाहेब जगताप यांना सांगितला. वेदांतचे आजोबा आण्णासाहेब यांनी ही घटना बघितल्याबरोबर तत्काळ लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वेदांतला आणले.

त्याच्यावर डॉ बाळकृष्ण आहिरे यांनी उपचार सुरू केले, मात्र वेदांतची प्रकृती चिंताजनक झाली. वेदांतला वाचवण्यासाठी डॉ मनोज आहेर, बाल रोग तज्ञ डॉ स्वप्नील पाटील यांची मदत घेत प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद मिळत नसल्याने वेदांतला जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्‍यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला.