Thu, Jul 09, 2020 22:17होमपेज › Nashik › जळगाव : मंत्री गुलाबराव पाटलांच्या स्वागतावेळी चेंगराचेंगरी; दोन महिला जखमी (video)

जळगाव : मंत्री गुलाबराव पाटलांच्या स्वागतावेळी चेंगराचेंगरी; दोन महिला जखमी (video)

Last Updated: Jan 01 2020 10:14PM

मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.जळगाव : प्रतिनिधी 

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आज जळगावातील स्वागतादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यात शिवसेनेच्या दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या. गुलाबराव पाटील यांचे आज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली.

वाचा : वर्गात पहिल्या आलेल्या मुलाला बाहेर बसविले; फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका

गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्स्प्रेसने जळगावात पोहोचले. गुलाबराव पाटील रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले.

वाचा : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये भूकंप; तीन तालुकाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनाही काहीवेळ कार्यकर्त्यांच्या गर्दीतून बाहेर पडता आले नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना गर्दीतून सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी गर्दी निंयंत्रणात आणल्यानंतर त्यांची मिरवणूक निघाली.