Tue, Jun 02, 2020 12:42होमपेज › Nashik › पदवीधर मतदानादरम्‍यान नाकिशमध्ये २ गटात हाणामारी

नाकिशमध्ये मतदानादरम्‍यान २ गटात हाणामारी

Published On: Jun 25 2018 10:55AM | Last Updated: Jun 25 2018 10:56AMउपनगर वार्ताहर (जि. नाशिक) : प्रतिनिधी

किशोर दराडे यांनी माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करीत नाशिकच्या बी. डी. भालेकर मतदान केंद्राबाहेर दराडे आणि बेडसे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन गटांनी माघार घेतली. 

याबाबत अधिक माहिती अशी, आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली अशी पोस्ट बेडसे समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आ नरेंद्र दराडे यांनी बेडसे समर्थकांकडे केला. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एक मेकांच्या डोक्यावर खुर्च्या मारून दोनही गटाचे कार्यकर्ते भिडले.त्यानंतर माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी आमदार नरेंद्र दराडे यांना शांत राहण्याची विनंती केली. पोलिसानीही या दोनही गटातील कार्यकर्त्यांना बाजूला सरीत हस्तक्षेप केला. त्या नंतर दोनही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी तंबी देऊन सोडून दिले. या ठिकाणी दराडे आणि बेडसे समर्थकांमध्ये सुरु असलेला राडा बघण्यासाठी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.