Sat, Nov 28, 2020 19:56



होमपेज › Nashik › वणी-नाशिक रस्त्यावर भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार (video)

वणी-नाशिक रस्त्यावर भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार (video)

Last Updated: Jul 06 2020 3:02PM




वणी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  

वणी-नाशिक रस्त्यावर वनविभागाच्या विश्राम समोर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे तसेच त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.

घडलेली घटना अशी की, म्हैस खडक (ता. सुरगाणा) येथील चिंतामण सावळीराम गायकवाड व राधा वाघमारे हे आपल्या गावाकडून नाशिकला जात असताना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. वणी-नाशिक रस्त्यावर सकाळी साडे दहा अकरा वाजण्याच्या दरम्यान वन विभागाच्या विश्राम गृहासमोर वणीकडून विटांनी भरलेला ट्रॅक्टर कृष्णगावाच्या दिशेने जात होता.

त्यावेळी नाशिकच्या दिशेने जाणारी दुचाकी क्र. एम एच. १५ एफ सी ४२५९ गाडीला ट्रॅक्टरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील चिंतामण सावळीराम गायकवाड (वय २५ रा. म्हैस खडक, उंबरठाण. ता. सुरगाणा) याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तो जागीच ठार झाला. ही धडक ऐवढी जोरात होती की, दुचाकीस्वाराचा मेंदू बाहेर पडला. त्याच्यासोबत असलेल्या राधा वाघमारे ही १९ वर्षाची तरुणी ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर वणी ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला नाशिकला हलविण्यात आले. 

ट्रॅक्टर चालक जगन भीमराव कडाळे (वय २२, रा. वरखेडा) यास किरकोळ दुखापत झाली आहे. वणी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.