Wed, Jun 03, 2020 07:41होमपेज › Nashik › सुमारे ११ लाख रूपयाचे चोरीचे साहित्य जप्त : एकास अटक

सुमारे ११ लाख रूपयाचे चोरीचे साहित्य जप्त : एकास अटक

Published On: Jan 26 2018 7:53PM | Last Updated: Jan 26 2018 7:53PMसिडको : वार्ताहर 

अंबड लिंक रोडवरील एका गाळ्यामध्ये नामांकित कंपन्यांचे  चोरीचे साहित्य असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी अंबड लिंक रोड वरील या गाळ्यावर छापा टाकला.  यावेळी पोलिसांना या गाळ्यात ११ लाख ४९ हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचे नामांकित कंपन्याचे चोरीचे साहित्य जप्त केले. तर याप्रकरणी संशयित आरोपी पंकज अशोक वर्मा (वय 34, रा. अंबड) याला पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, अंबड लिंक रोडवरील राधाकृष्णनगर येथील पंकज अशोक वर्मा यांच्या घरातील गाळयांमध्ये नामांकित कंपन्याचे चोरीचे साहित्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना याठिकाणी बॉश, महिंद्रा, महिंद्रा सोना कंपनीचे स्पेअरपार्ट व डिझेल वाहनांचे फ्यूलइंजेक्टर कन्व्हेशनल फ्यूलइंजेक्टर, आणि मेटल क्रोस असा सुमारे ११ लाख ४९ हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचा चोरीचा माल आढळून आला. पोलिसांनी हा माल ताब्यात घेत संशयित पंकज यास अटक केली. याबाबत सातपुर पोलिस ठाण्यात बॉश कंपनीतील शिवाजी काकड यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा क्रमांक 02 पोलिसांच्या वतीने करण्यात आली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा अंबड लिंकरोडवर चोरीचे साहित्य अजूनही खरेदी विक्री केली जात असल्याचा दाट संशय निर्माण होत आहे.  काही दिवसांपूर्वीच अंबड पोलिसांनी बॉस कंपनीतील साहित्य विकणाऱ्या एकास गजाआड केले होते.