Mon, Nov 18, 2019 23:00होमपेज › Nashik › ...आणि योगिताने स्वराचे रडणे कायमचे बंद केले

...आणि योगिताने स्वराचे रडणे कायमचे बंद केले

Published On: Jul 19 2019 2:17AM | Last Updated: Jul 19 2019 12:45AM
पंचवटी : वार्ताहर 

स्वरा ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिचे रडणेदेखील वाढले होते. योगिताला स्वराचा कंटाळा आलेला होता. स्वरावरील औषधोपचाराचा आणि तिचा सांभाळ करण्याचा योगिताला वीट आला होता. हा कंटाळा पुढे तिटकार्‍यात बदलला आणि योगिताने अत्यंत थंड डोक्याने स्वराच्या गळ्यावर ब्लेड चालवले. स्वराचे रडणे कायमचे बंद केले. वरून घरात शिरलेल्या चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव केला होता, असे पोलीस तपासातून पुढे आले आहे.

औरंगाबाद रोडवरील साई पॅराडाइज सोसायटीमधील रहिवासी योगिता मुकेश पवार हिने घरात एकटी असताना, मंगळवारी (दि. 16) स्वत:ची लेक स्वरा (14 महिने) हिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांकडे तक्रार नोंदवताना अज्ञात चोरट्याने स्वराची हत्या केल्याचा बनाव केला. पंचनाम्यात समोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून योगिताचा बनाव उघडकीला आला. योगिता पवार हिला पोलिसांनी बुधवारी (दि. 17) अटक केली होती.