Mon, Nov 18, 2019 18:52होमपेज › Nashik › नाशिक : ट्रेकिंग करताना मुले पडली; वाचविण्यात यश (व्हिडिओ)

नाशिक : ट्रेकिंग करताना मुले पडली; वाचविण्यात यश (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरातील चामरलेनी परिसरात चार शाळकरी विद्यार्थी ट्रेकिंगसाठी गेले असताना पडले होते. या मुलांना वाचविण्यात यश आले आहे. पोलिस, स्थानिक नागरिक आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी या मुलांना सुरक्षित बाहेर काढले. यातील जखमी देवेंद्र जाधव आणि दीपक खैरनार या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.  

घटनेची प्राथमिक माहिती अशी, चामरलेनी परिसरात ट्रेकिंग करताना चार शाळकरी विद्यार्थी पडले होते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच असलेले देवेंद्र जाधव आणि सौरभ पाटील या विद्यार्थ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात देवेंद्र पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या पायास गंभीर दुखापत झाली. 

 

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. शीघ्र कृती दलाच्या जवानांसह अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहर काढण्यात आले. बचाव कार्य तब्बल पाच तास सुरू होते.