Fri, Jun 05, 2020 18:55होमपेज › Nashik › सख्ख्या मुलाकडून बापाचा खून

सख्ख्या मुलाकडून बापाचा खून

Published On: Mar 28 2019 2:54PM | Last Updated: Mar 28 2019 4:30PM

file photoनाशिक रोड ­: वार्ताहर 

आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून उपनगर गौतमनगर येथील एका व्यक्तीने आपल्या वडिलांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून खून केल्याची घटना काल पहाटे साडेचार वाजता घडली आहे. फोन केल्यानंतर संशयित स्वतः पोलिस स्टेशन येथे हजर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असून ही कौटुंबिक वादामधून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

उपनगर जवळील गौतम नगर, जेलरोड येथे एडके कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. भगवान नामदेव एडके (वय ६५) हे आपली तीन मुले पत्नी, सुना, नातवंडे यांच्यासह राहतात. काल (दि. २८) रोजी रात्री सर्व कुटुंबीय जेवण झाल्यानंतर झोपी गेलेले असताना संशयित सिद्धार्थ भगवान एडके हा  भगवान एडके यांचा मुलगा पहाटे चार पंचेचाळीसच्या सुमारास ते झोपलेले असताना त्यांच्या खोलीत आला. त्याने घरातील दगडी पाटा घेऊन वडील भगवान नामदेव एडके यांच्या डोक्यावर दगडी पाटा जोरात टाकला. यामध्ये भगवान एडके हे जागीच गतप्राण झाले.

त्यांच्या पत्नी आई यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली असता भगवान एडके यांचा लहान मुलगा अशोक एडके हा धावत खोलीमध्ये आला. त्यावेळी सिद्धार्थ एडके हा आपल्या आजीला मारहाण करीत होता. यावेळी अशोकने सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धार्थ त्यालाही आवरत नव्हता. यात आजी जखमी झाली. घरात आरडाओरड झाल्यानंतर घडल्यानंतर सर्वजण जागे झाले.

यावेळी गतप्राण झालेले भगवान शेळके यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्राणज्योत मालावलेली होती. यावेळी परिसरात आरडा ओरड झाल्याने आसपासचे रहिवासी जागे झाले. काय झाले हे कोणालाही समजत नव्हते. त्यावेळी सिद्धार्थ बाहेर आल्यानंतर सर्वांना गंभीर प्रकार घडला असावा याची जाणीव झाली.

यावेळी संशयित आरोपी सिद्धार्थ भगवान एडके हा उपनगर पोलिस स्टेशन येथे स्वतः जाऊन हजर झाला आणि पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नी आणि वडिलांच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

उपनगरच्या  गौतम नगर येथील या खुन्याला संशयित आरोपी सिद्धार्थ यांची पत्नी आणि वडील भगवान एडके यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांनी वडिलांचा खून केला आहे. या आधी तीन वेळा त्यांच्या घरात याच कारणावरून प्रचंड भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने आपल्या वडिलांना मारहाण करून जखमी केले होते.

मात्र, वडिलांनी मुलाला त्रास होईल या कारणास्तव पोलिस स्टेशनला तक्रार दिली नाही. यासंदर्भात पुढील तपास उपनगर पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत असून सत्य लवकरच उजेडात येईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खून झाल्याने या परिसरात राजकीय पूर्ववैमनस्यातून हा खून झाला अशी शंका नागरिकांना येत होती. मात्र हा कौटुंबिक कारणावरून झाला असल्याचा दावा उपनगर पोलिसांनी केला असून पुढील तपास उपनगरचे पोलीस निरीक्षक भारत कुमार सूर्यवंशी करीत आहे.