Tue, Nov 19, 2019 13:29होमपेज › Nashik › प्रलंबित मागण्यांसाठी घरेलू कामगार संघटनेची जोरदार निदर्शने

प्रलंबित मागण्यांसाठी घरेलू कामगार संघटनेची जोरदार निदर्शने

Published On: Jun 18 2018 6:08PM | Last Updated: Jun 18 2018 6:08PMसातपूर : वार्ताहर 

घरेलू कामगाराच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर सीआयटू संलग्न महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने जोरदार निर्देशने केली. यावेळी शहर परिसरातील घरेलू कामगार महिला उपस्थित होत्या. घरेलू कामगार महिलांना घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, मंडळाच्या वतीने राबवण्‍यात येणाऱ्या योजनांच्‍या लाभार्थीची वयोमर्यदा वाढवण्‍यात यावी. आरोग्य विमा, पेन्शन योजना लागू करावी, फंड, ग्रॅच्युईटी, साप्ताहिक सुटी, घरेलू कामगारांची नोंदणी व् नूतनिकरन, ओळखपत्र देने, आजारपणाची रजा अशा सुविधा लागू व्हाव्यात, या मागण्यांसाठी महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनांच्या कामगार महिलांच्यावतीने सोमवारी (दि १८) स‌हाय्‍यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. व जोरदार घोषणाबाजी करुन निर्दशने केली.

सहाय्यक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना यावेळी निवेदन देण्यात आले. घरेलू कामगारची वयोमर्यादा वय वर्ष ७० असणाऱ्या लाभ देण्यात यावा, घरकामंगार मुलांना शिष्यवृत्ती द्‍यावी, किमान वेतन, आठवडयातून १ दिवस पगारी सुट्टी, दिवाळी बोनस द्यावा, पंतप्रधान आवस योजने अंतर्गत मोफत घरे देण्यात यावी. घरेलू कामगार मागण्यासाठी जिल्हा व राज्य पातळी वर आंदोलने करून देखील राज्य शासन असंघटीत कामगाराकडे दुर्लक्षित करीत आहेत. किमान वेतनासह कामगार कायदे लागू करण्याचे आश्वासन देखील अद्याप पूर्ण केले नाही. 

यामुळे महिला कामगारांनी यावेळी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेच्या सरचिटणीस कॉ. सिंधु शार्दुल, वसुधा कराड, मोहन जाधव, मंगला पाटील, विजया टीक्कल, कल्पना शिंदे, संजय पवार आदीसह इतर पदाधिकारी व घरेलू महिला कामगार उपस्थित होत्या.