Wed, Jun 03, 2020 22:31होमपेज › Nashik › पाटणादेवीच्या जंगलात चंदन तस्कराला अटक; १२ हजारांचा ऐवज जप्त

पाटणादेवीच्या जंगलात चंदन तस्कराला अटक; १२ हजारांचा ऐवज जप्त

Published On: Feb 26 2019 1:18AM | Last Updated: Feb 26 2019 1:18AM
जळगाव : प्रतिनिधी 

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी गौताळा अभयारण्यात गस्त घालत असताना  तोडण्याचा आवाज आला असता त्याची तपासणी केली असता त्याठिकाणी चंदनाचे झाडे तोडत असताना दिसले त्यांचा पाठलाग करून त्यातील एक आरोपीला पकण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले यात मात्र एक वनमजुर जखमी झाला आहे 

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी गौताळा अभयारण्यात आज (दि.२५) दुपारी वन्यजीव विभागाचे पथक कंपार्टमेंट नंबर 303 परिसरात गस्त घालत असताना त्यांना काहीतरी तोडण्याचा आवाज आला असता त्या दिशेने या पथकाने शोध घेतला असता तीन चंदनचोर चंदनाचे झाडे तोडून चोरून नेण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्यांचा पाठलाग केला असता या आरोपींनी या पथकावर प्रतिहल्ला केला. त्यामध्ये रोजंदारी वनमजूर हिरासिंग चव्हाण जखमी झाला असून दोन आरोपी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. एक आरोपी सरदार खान मेवाती पठाण (रा. ब्राम्हणी गराडा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद) यास या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १२ हजार रुपये किमतीचे चंदनाच्या लाकडाचे गोल आकाराचे तुकडे जप्त केले आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली अवजारे कुदळ, कुऱ्हाड, करवत व पट्टा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.