Wed, Jan 20, 2021 09:04होमपेज › Nashik › वावीत दरोडा : लाखोंचा ऐवज लंपास

वावीत दरोडा : लाखोंचा ऐवज लंपास

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:32AM

बुकमार्क करा

वावी : वार्ताहर

सिन्‍नर तालुक्यातील वावी परिसरातील  गायत्रीनगरमध्ये राहणार्‍या डॉक्टरच्या घरावर शुक्रवारी (दि.8) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी चाकू व पिस्तूलचा धाक दाखवून तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. 

येथील साईभक्‍त निवासच्या  समोर स्वप्नपूर्ती बंगल्यात डॉ. रमेश देव्हाड यांच्या बंगल्यात गुरुवारी (दि. 7) रात्रीच्या सुमारास दरोडा पडला. देव्हाड कुटुंबियांसह झोपलेले असताना दरोडेखोरांनी स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातून दहा ग्रॅम सोन्याची पोत, कानातील झुबे, अंगठी, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाइल आदींसह एक लाख पंधरा हजारांची रोकड असा तब्बल 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

मागील आठवडाभरात वावी परिसरात चोरीच्या तीन घटना घडल्या.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सिन्‍नर तालुक्यातील वावी परिसरातील  गायत्रीनगरमध्ये राहणार्‍या डॉक्टरच्या घरावर शुक्रवारी (दि.8) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी चाकू व पिस्तूलचा धाक दाखवून तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 

येथील साईभक्‍त निवासच्या  समोर स्वप्नपूर्ती बंगल्यात डॉ. रमेश देव्हाड हे पत्नी निर्मला, मुलगी वैष्णवी, मुलगा ओमकार आदींसह वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. 7) रात्री नेहमीप्रमाणे देव्हाड कुटुंबीय जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात सहा दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागच्या बाजूने स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये झोपलेल्या निर्मला देव्हाड यांना अचानक आवाज आल्याने त्या हॉलमध्ये झोपलेल्या मुलांना पाहण्यासाठी बाहेर आल्या. 

मुलांना व्यवस्थित पाहून निर्मला देव्हाड पुन्हा बेडरूममध्ये परत जाताना पाठीमागून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना धक्‍का दिला. दरोडेखोर समोर दिसताच त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्यारधारी दरोडेखोरांनी देव्हाड दाम्पत्यांना चाकूचा व पिस्तूलचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. कपाटाच्या चाव्या देण्यास नकार दिल्याने दरोडेखोरांनी देव्हाड दाम्पत्याचे हातपाय बांधून ठेवले व मुलांवर पिस्तूल रोखले. 

चावी देत नसल्याने दरोडेखोरांनी देव्हाड दाम्पत्यास मारहाण केली. लोखंडी टॉमी आणि हातोडीच्या मदतीने कपाट तोडून सर्व सामान अस्ताव्यस्त केले. कपाटातील दहा ग्रॅम सोन्याची पोत, कानातील झुबे, अंगठी, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाइल आदींसह एक लाख पंधरा हजारांची रोकड असा तब्बल 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

दरोडेखोरांनी संपूर्ण कुटुंबाचे हातपाय साडीने बांधून ठेवले होते.  वैष्णवीने स्वतःची सुटका करून आई-वडिलांची सुटका केली. त्यानंतर भयभीत झालेल्या शेजार्‍यांच्या मदतीने घराचे दरवाजे उघडण्यात आले. तोपर्यंत दरोडेखोर फरार झाले होते.दरोड्याची माहिती कळताच  सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे  यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात नाकाबंदी केली. मात्र, दराडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

शुक्रवारी सकाळी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, कोणताही सुगावा लागला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे, निरीक्षक मुकुंद देशमुख, हरिभाऊ कोल्हे आदींनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. वावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.