Wed, Jun 03, 2020 08:34होमपेज › Nashik › सिन्नर येथील वावीत दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

सिन्नर येथील वावीत दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास

Published On: Dec 08 2017 11:09AM | Last Updated: Dec 08 2017 11:09AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यात वावी येथे पुन्हा धाडसी दरोडा पडला आहे. गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास येथील साई भक्त समोर डॉ. रमेश देव्हाड यांच्या निवास स्थानी दरोडेखोरांनी सशस्‍त्र दरोडा टाकला. डॉ. देव्हाड आणि त्यांच्या पत्नीला चाकुचा धाक दाखवून जवळ पास एक लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरून नेला. 

चोरट्यांनी डॉ. देव्हाड यांच्या पत्नी आणि मुलांना साडीने हाथ पाय बांधून रोकडसह घरातील दागिने चोरून नेले.