Tue, May 26, 2020 10:39होमपेज › Nashik › छिंदम प्रकरणी नाशिकात शिवप्रेमींचा रास्तारोको

छिंदम प्रकरणी नाशिकात शिवप्रेमींचा रास्तारोको

Published On: Feb 17 2018 3:52PM | Last Updated: Feb 17 2018 3:59PMनाशिक : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याने अपशब्द काढल्याच्या घटनेचे पडसाद दुसर्‍या दिवशीही शहरात उमटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी शनिवारी (दि. 17) मेहेर चौकात रास्तारोको केला. 

छिंदम यांच्यावर राष्ट्रद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवप्रेमींनी केली. दरम्यान, विविध संघटनांनीही या घटनेचा निषेध नोंदवत त्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

शिवप्रेमींनी मेहेर चौकात रास्तारोको केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. ज्यांच्या गौरवशाली इतिहासाने आजही प्रेरणा मिळते अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छिंदम यांनी अपशब्द काढून अखिल विश्‍वातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे छिदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेमुळे शिवप्रेमींच्या मनाचा उद्रेक होणार नाही याबाबत तातडीने काळजी घ्यावी, असेही आवाहन शिवप्रेमींनी केली आहे.

आंदोलनात अनिल भडांगे, दत्तु बोडके, विलास देसले, बाळा निकम, नाना बच्छाव, शिवाजी शेलार, योगेश कापसे, आकाश चव्हाण, जगन काकडे यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूकीची कोंडी झाली.