Sat, Nov 16, 2019 04:00होमपेज › Nashik › नाशिक : राजेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

नाशिक : राजेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Published On: Mar 07 2018 7:07PM | Last Updated: Mar 07 2018 7:07PMत्र्यंबकेश्वर : वार्ताहर 

त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केल्याची घटना समोरल आली आहे. या प्रकरणी गावातीलच दिनकर शिवा येले (वय १९ ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार २३ जानेवारी रोजी घडला आहे. मात्र, जात पंचायतीच्या दबावाखाली अल्पवयीन मुलीवर हे प्रकरण दाबल्याचा प्रकार झाल्‍याचे समोर आले. श्रमजीवी संघटनेने हा प्रकार उघडकीस आणून जात पंचायतिच्या प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे नाशिक जिल्ह्यात आजही जातपंचायतीचे वर्चस्व उघड झाले असल्याने खळबळ उडाली आहे.

नाशिक तालुक्यातील राजेवाडी, भोकरपाडा येथील १५ वर्षीय मुलीवर २३ जानेवारी रोजी संशयित दिनकर शिवा येले याने जबरदस्तिने घरात घुसून अत्याचार केले होते. हा प्रकार पीडितेने घरच्या व्यक्तींना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात गुन्हा नोंदवण्याची तयारी केली. परंतु, हा प्रकार जात पंचायतीला समजल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना गुन्हा नोंदवण्या पासून परावृत्त करत दोघांचे लग्न लावून देण्याचे निश्चित केले. त्या बाबत कागदपत्रे तयार करण्यात आली, मात्र पुढे मुलाच्या घरच्यांनी लग्न लावण्यास नसल्याची चर्चा घडवून आणली. मुलीच्या वडिलांनी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याने जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकण्याचे आणि त्यांच्याशी संबंध तोडण्याचे जाहीर केले. 

हा प्रकार श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांना समजल्या नंतर त्यांनी पीडितेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर बुधवारी त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.