Wed, Jun 03, 2020 08:02होमपेज › Nashik › पुढारीच्या ‘पॉलिटिकल आयडॉल’चे प्रकाशन 

पुढारीच्या ‘पॉलिटिकल आयडॉल’चे प्रकाशन 

Published On: Sep 06 2019 1:44AM | Last Updated: Sep 05 2019 11:42PM
नाशिक : प्रतिनिधी

दै. पुढारीच्या ‘पॉलिटिकल आयडॉल’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवारी (दि.5) एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे या मान्यवरांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले. पुस्तिकेविषयी ‘पुढारी’चे निवासी संपादक सुधीर कावळे यांनी संकल्पना स्पष्ट केली, तर युनिट हेड प्रल्हाद इंदोलीकर यांनी आभार मानले. जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेऊन त्यावर प्रकाशझोत टाकणार्‍या लेख आणि मुलाखतींचा ‘पॉलिटिकल आयडॉल’ या पुस्तिकेत समावेश आहे.