Wed, Feb 19, 2020 09:52होमपेज › Nashik › नाशिक : रेल्वेतून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : रेल्वेतून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Last Updated: Oct 09 2019 6:38PM

संग्रहित छायाचित्रलासलगांव : वार्ताहर

लासलगांव रेल्वे स्थानकावर भरधाव रेल्वेतून पडून ३० वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.(९) दुपारी १ वाजेच्या सुमारास  घडली.

याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महेंद्र सिताराम उमाळे (रा.जळगाव) असे मयत इसमाचे नाव असून, महेंद्र उमाळे हे गोदान एक्स्प्रेसने प्रवास करत असताना लासलगांव रेल्वे स्थानकाजवळ खाली पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला ,पायाला व हाताला गंभीर मार लागल्याने येथील एएसआय महेश महाले, पोलिस कॉन्स्टेबल नितीन टुपके यांच्यासह तिघा सफाई कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचारासाठी सलगांव येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी महेंद्र सिताराम उमाळे यांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले.