Fri, Jul 10, 2020 20:17होमपेज › Nashik › ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’साठी दिव्यांगाचे भारत भ्रमण

‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’साठी दिव्यांगाचे भारत भ्रमण

Published On: Dec 08 2017 7:24PM | Last Updated: Dec 08 2017 7:24PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी 

स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, दिव्यांग हिताय भारत हा संदेश घेऊन इंदौर  येथील दिव्यांग युवक प्रदीप मिरदवाल  29  राज्यात 15 हजार किमीचा सायकल प्रवास करणार आहे. जून 2018 मध्ये  इंदोर येथे प्रवासाची सांगता होणार असुन या युवकाचे शुक्रवारी नाशकात आगमन झाले. त्यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे  जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद व  बबलू मिर्झा यांनी त्यांचे स्वागत केले.

 चौदा नोव्हेंबर रोजी इंदोर येथून या सायकल प्रवासाला सुरुवात झाली.  रेल्वेच्या प्रवासादरम्यान एक पाय गमावलेल्या प्रदीप मिरदवाल हा 29 राज्यात पंधरा हजार कि मी चा प्रवास  सायकलने करणार आहे . धुळे, मालेगाव मार्गे प्रवास करत शुक्रवारी दुपारी चार वाजता प्रदीप मिरदवालचे नाशिक शहरात आगमन झाले. एका रेल्वे अपघातात प्रदीपचा पाय निकामी झाला आहे  असे असले तरी प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर जागतीक विक्रम प्रस्थापीत करणारच हे ध्येय ठेवुन  हा प्रवास करीत असल्याचे प्रदीपने सांगितले. नाशिक-मुबंई-गोवा-केरळ-कर्नाटक-तेंलगणा-आंध्रप्रदेश- छत्तीसगढ-उडिसा-पश्‍चिम बंगाल-आसाम-अरुणाचल प्रदेश-मणिपुर-मेघालय-मिझोराम- त्रिपुरा-उत्तरप्रदेश-उत्तराखंड-हिमाचल प्रदेश-जम्मु काश्मिर-हरियाणा-पंजाब-राज्यस्थ्लृान-अहमदाबाद-झाबुआ-मध्यप्रदेश (इंदोर) असा हा प्रवास राहणार आहे.