होमपेज › Nashik › 'आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे ही लोकभावना'

'आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे ही लोकभावना'

Published On: Jul 17 2019 7:49PM | Last Updated: Jul 17 2019 7:49PM
जळगाव : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असावे याचा अर्थ असा की मुख्यमंत्री बनण्याचे सर्व गुण हे आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बनावे ही लोकभावना आहे. तसेच पक्षाची सुद्धा आहे. असे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद दौऱ्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन आशिर्वाद दौऱ्याची सुरवात उत्तर महाराष्ट्रतून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी खा. राऊत म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्र शिवसेनामय करायचा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याची सुरवात उत्तर महाराष्ट्रतून करीत आहोत. कारण शिवसेना सत्तेत असो की नसो नेहमीच शिवसेनेच्या पाठीमागे जनता उभी राहिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात भगवा लागणार आहे त्यात उत्तर महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे राहणार आहे.

युतीची घोषणा अमित शहा व उद्धव ठाकरे यांनी केली त्यावेळी स्पष्ट केले आहे की जागा वाटप समसमान राहणार आहे. यावेळेस आम्ही गाफील राहिलेलो नाही. उमेदवाराची चाचपणी पूर्ण झाली आहे. युती नव्हती त्यावेळेस 288 जागा लढविण्याची तयारी होती. मात्र मताचे विभाजन होऊ नये म्हणून युती झाली आहे. राज्यातील प्रत्येक जागा ही युतीची म्हणून लढणार आहोत. 

आम्ही सत्तेत आहोत मात्र पीक विमा कंपनी ही सत्तेत सहभागी नाही आहे. जे आम्ही सत्तेत असून शेतकऱ्यांसाठी काम करीत आहोत हे काम विरोधकांचे आहे. मात्र राज्यभर विरोधी पक्ष कुचकामी ठरला आहे. ते बेशरम आहोत. त्यांना या प्रश्नांची जाण नाही. त्यांच्यात वैफल्यग्रस्त निराशा दिसत आहे. अशी टिका खा. राऊत यांनी केली.