Wed, Jun 03, 2020 08:06होमपेज › Nashik › कुख्यात फरारी गुन्हेगार गटऱ्या पोलिसांच्या ताब्यात 

कुख्यात फरारी गुन्हेगार गटऱ्या पोलिसांच्या ताब्यात 

Published On: Apr 28 2018 4:07PM | Last Updated: Apr 28 2018 4:07PMदेवानंद बैरागी , पंचवटी वार्ताहर

पंचवटी परिसरात आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. टोळीमधील तिघा संशयित आरोपीसह तीन बालगुन्हेगारांनादेखील पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किंमतीचे १०९ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे. या करवाईदरम्यान  अनेक गंभीर गन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात संशयित आरोपी गटऱ्याला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. गटऱ्याला न्यायालयात उभे केला असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .  

पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली होती की, गंगाघाटावरील आठवडे बाजार, तसेच ग्रामीण भागातील बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे काही चोर गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरी करीत आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या संशयित आरोपींचा शोध सुरु होता . 

 पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर याना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांना मोबाईल चोरांचा सुगावा लागला. त्यांनी पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक महेश इंगोले, गुन्हे शोध पथकाचे बाळनाथ ठाकरे, विलास बस्ते, सुरेश नरवडे, दशरथ निंबाळकर, संतोष काकड, मोतीराम चव्हाण, संदीप शेळके, सतीश वसावे, महेश साळुंके, सचिन म्हसदे, विलास चारोस्कर, भूषण रायते, जितेश जाधव याना मार्गदर्शन करून आरोपींच्या मागावर पाठविले. या पथकाने सुनील उर्फ गटऱ्या नागू गायकवाड, संपत लक्ष्मण वाघ, विकी उर्फ़ गट्ट्या संजय जाधव आणि त्यांचे इतर ३ संशयित बाल गुन्हेगारांना पकडले. अटक  करण्यात आलेल्यांमधील गटऱ्यावर इतर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो फरार होता. 

या संशयित आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्या इतर साथीदारांबाबत चौकशी केली असता त्यांनी सर्वानी मिळून नाशिक शहरात, सायखेडा, दिंडोरी, वणी, आडगाव, निफाड, पिंपळगाव आणि इतर ग्रामीण भागातील आठवडे बाजारातून चोरलेले सुमारे ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे १०९ विविध कंपनीचे मोबाईल हँडसेट हस्तगत केले. 

या संशयित आरोपीना न्यायालयात उभे केले असता  गटऱ्या याला सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे . तर उर्वरित संशयित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या संशयितांकडून अजूनही काही मोठे शहर परिसरातील आणि ग्रामीण भागातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आत्तापर्यंत संशयित आरोपी गटऱ्या याने पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन जबरी लूट आणि २ मोबाईल चोरी केल्याचे गुन्हे कबुल केले आहे .   

कुख्यात गटऱ्याची दहशत 

 संशयित आरोपी सुनील उर्फ गटऱ्या नागू गायकवाड याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी लूट, घरफोडी, मारहाण करणे, हत्याराचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेवून लूटमार करणे, फोनवर बोलत असलेल्या नागरिकांचे फोन हिसकावून घेऊन जाणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच संशयित  गटऱ्या हा कायम आपल्यासोबत कोयता ठेवत होता. याची संपूर्णपणे पोलिसांना कल्पना होती . ज्यावेळी गटऱ्या याला पकडण्यासाठी पोलीस गेले त्यावेळी संशयित आरोपी झोपलेला होता. त्याचाच फायदा घेत गुन्हे शोध पथकाच्या टीमने त्याच्यावर झडप मारून त्याला जेरबंद केले .तसेच कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याने त्याचा पाठलाग केल्यास निर्जन स्थळी घेऊन जात त्यांच्यावर हल्ला करण्याची त्याची तयारी असायची.  नुकत्याच दोन दिवसांपूर्वी त्याने रामवाडी येथील चौघुले पेट्रोल पंपाशेजारी काही विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता.  विद्यार्थ्यांनी मोबाईल देण्यास नकार देताच त्यांच्यावर देखील गटऱ्या याने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच त्याच्या मित्राने बाजूला ढकलल्याने पुढील मोठा अनर्थ टळला होता. याबाबत देखील पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .    

आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणारी हि टोळी पंचवटी पोलिसांनी पकडल्याने पुढील काही दिवस तरी परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांवर अंकुश बसणार आहे. तसेच ज्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला गेले आहे . त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केले आहे .