Tue, Jul 07, 2020 04:26होमपेज › Nashik › नाशिक : आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

नाशिक : आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

Last Updated: May 26 2020 2:55PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या ५४ वर्षीय चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा चालक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील रहिवासी असलेले चालक कामगारांना पोहोचवण्यासाठी चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेशामध्ये काही दिवसांपूर्वी गेले होते. उत्तर प्रदेशमधून परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. परतीच्या प्रवासात १८ मे रोजी चांदवड मध्ये त्यांना ताप, खोकला व श्वसनाचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना चांदवडमधील कोविड हेल्थ सेंटर येथे त्यांनी तपासणीसाठी दाखल केले. तेथे दम लागणे व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी आढळून आले. म्हणून तेथे त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. १९ मे रोजी त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला. 

त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तीनशेपेक्षा जास्त होते. एक्सरेमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आयसीयुमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते. मात्र सोमवारी (दि.२५) त्यांचा मृत्यू झाला.