Tue, Jun 02, 2020 23:04होमपेज › Nashik › नगरसेविकेविरोधात गुन्हा; अधिकाऱ्याचे निलंबन

नगरसेविकेविरोधात गुन्हा; अधिकाऱ्याचे निलंबन

Published On: Jun 25 2019 2:54PM | Last Updated: Jun 25 2019 2:56PM
नाशिक : प्रतिनिधी

रमजान ईदला शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत मनपा अधिकारी राजेंद्र धामणकर यांनी नगरसेविकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मनपा अधिकारी धामणकर यांचे महासभेत महापौरांनी निलंबन केले. भाजप नगरसेवक सतीश कुलकर्णी, दीपाली निकुळे, शाहीन मिर्जा, चंद्रकांत खोडे यांच्या विरोधात मनपा अधिकारी राजेंद्र धामणकर यांनी शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

भाजप नगरसेवक सतीश कुलकर्णी, दीपाली निकुळे, शाहीन मिर्जा, चंद्रकांत खोडे यांनी शहरात रमजान ईदच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते. याप्रकरणी मनपा अधिकारी राजेंद्र धामणकर यांनी शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सर्व पक्षीय नगरसेवक महासभेत चांगलेच आक्रमक झाले होते. संबंधित नगरसेविकानी होर्डिंग्जशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. हे होर्डिंग्ज कार्यकर्त्यांनी लावले होते यामुळे याची शहानिशा न करता नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करून लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याचा ठपका ठेवून महापौर रंजना भानसी यांनी अधिकारी धामणकर यांचे तत्काळ निलंबित केले. तसेच नगरसेवकांविरोधातील गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले.