Fri, Jul 10, 2020 09:02होमपेज › Nashik › नाशिकरोड रेल्वे स्थानकाला 'आयएसओ' प्रमाणपत्र 

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला 'आयएसओ' प्रमाणपत्र 

Published On: Aug 02 2019 8:27AM | Last Updated: Aug 02 2019 8:27AM
चेहेडी (नाशिक) : वार्ताहर

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला नुकतेच आयएसओ 1400:2015 सर्टिफिकेट जाहीर झाले आहे. नाशिकरोड आणि भुसावळ विभागातील रेल्वेच्या सूत्रांनी ही महिती दिली. पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीशी संबंधित हे प्रमाणपत्र आहे. संस्थेच्या प्रतिनिधींनी नाशिक रोड रेल्वेस्थानकाची पाहणी केली. त्यामध्ये परिसर स्वच्छता, कच-याची विल्हेवाट, रेल्वे स्थानकातील घातक सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा यांची योग्य व्यवस्था करणे याबाबींची पाहणी केली. त्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात आले. जुलै 2019 ते जुलै 2022 असा प्रमाणपत्राचा कालावधी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेत पुणे स्थानकाला याआधी आयएसओ मिळाले होते. तर भुसावळ विभागात असा मान मिळणारे नाशिकरोड पहिले स्थानक आहे. स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, मुख्य स्वच्छता निरीक्षक अमोल शहाणे यांचे तसेच कर्मचा-यांचे अभिनंदन केले जात आहे. 

स्थानक आणि परिसरात २४ तास स्वच्छता राखली जाते. त्यासाठी ६५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाडसह अकरा स्थानकांनी आयएसओ सर्टिफिकेटसाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी तयारी सुरु केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.