Tue, Aug 11, 2020 21:51होमपेज › Nashik › नाशिकरोड नोट प्रेसमध्ये आग

नाशिकरोड नोट प्रेसमध्ये आग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर

देशाला चलन पुरवठा करणार्‍या नाशिकरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील भंगाराच्या गोदामाला सोमवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली.  प्रेस अग्निशमन दलाच्या दोन आणि मनपाच्या चार बंबांनी आग आटोक्यात आणली. आग गंभीर नसून यात काहीही मोठी हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दल तसेच प्रेसच्या सूत्रांनी दिली. तथापि, प्रेस प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. 

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन व पथकाने घटनास्थळी जाऊन बचावकार्यात मदत केली. सोमवारी सायंकाळी चौथ्या विंगमधील भंगारच्या गोदामाला आग लागल्याचे सुरक्षा कर्मचार्‍यांनी पाहिले. त्यांनी ही घटना प्रेस प्रशासनाला तातडीने कळवली. प्रशासनाने विलंब न करता मनपाच्या नाशिकरोड येथील अग्निशमन दल व पोलिसांनाही पाचारण केले. आग भडकू लागल्याने अग्निशमन दलाच्या शहरातील आणखी दोन बंबांना बोलावण्यात आले. आगीचे ठिकाण आणि नोट छपाई कारखाना यामध्ये बरेचसे अंतर असल्याने प्रेसला कोणताही धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले.