Fri, Nov 22, 2019 08:19होमपेज › Nashik › नाशिक : अल्‍पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्‍न 

नाशिक : अल्‍पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्‍न 

Published On: Jan 19 2019 6:28PM | Last Updated: Jan 19 2019 6:28PM
नाशिक : प्रतिनिधी 

अल्पवयीन युवकाने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित मुलीने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिची अनुराधा थिएटरमागे राहणाऱ्या एका युवकाबरोबर ओळख झाली होती. 17 जानेवारीला सायंकाळी आठच्या सुमारास घरी कोणी नसतांना हा युवक घरात आला. त्‍याने घराचा दरवाजा बंद करीत युवतीला कपडे काढायला सांगितले. तसेच त्‍या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत मानेवर कडकडून चावा घेतला. त्याच वेळी मुलीचे वडील घरी आल्याने पुढील प्रसंग टळला. त्यांनी युवकाला जाब विचारला. मुलीच्या तक्रारी नुसार पोलिसांनी संशयित अल्पवयीन युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते या घटनेचा तपास करीत आहेत.