Fri, Sep 18, 2020 19:15होमपेज › Nashik › भक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन

भक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कोपर्डी घटनेप्रकरणी जलदगती न्यायालयात शासनाने योग्य बाजू मांडल्याने योग्य निकाल लागला आहे. याचपद्धतीने शासन यापुढेही आपली बाजू भक्कमपणे मांडून आरोपींची शिक्षा कायम राहील यासाठी प्रयत्न करेल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी समीट कार्यक्रमासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. कोपर्डी येथील घटनेबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता होती. या घटनेच्या विरोधात न्याय मिळावा म्हणून मराठा समाजबांधवांनी शांततेत मोर्चे काढले. त्याचेही यात श्रेय म्हटले पाहिजे. जलदगती न्यायालयीन प्रक्रिया राबविली. परंतु, त्यानंतरही काहीसा विलंब झाला असला तरी बाजू भक्कमपणे मांडली गेल्याने आरोपींना योग्य ती शिक्षा झाली आहे. खरे तर झालेली घटना अशोभनीय आणि निर्घृण अशीच होती. त्यासंदर्भात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी मोठ्या कौशल्याने हा खटला हाताळत आरोपींना योग्य त्या शिक्षेपर्यंत नेले आहे. आता या घटनेत पुढे दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असे झाले तर शासनही आपली बाजू पुन्हा अधिक भक्कमपणे मांडेल आणि त्यात विलंब होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. शिक्षेमुळे गुन्हेगारांना आळा बसेल, असा विश्‍वासही व्यक्त केला.