Fri, Jul 10, 2020 09:23होमपेज › Nashik › मंत्रालय क्लार्क लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

मंत्रालय क्लार्क लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Published On: Jan 24 2019 8:10PM | Last Updated: Jan 24 2019 8:10PM
जळगाव : प्रतिनिधी 

अमरावतीहून जळगावला बदली माझ्‍यामुळेच झाली असून, त्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच देण्याची मागणी मंत्रालयातील क्लार्क ओमप्रकाश लखनलाल यादव (वय 32) याने एका क्‍लार्ककडे केली. तसेच पैसे न दिल्‍यास नोकरीची वाट लावण्याची धमकी दिली, मात्र ही धमकी या क्‍लार्कला चांगलीच महागात पडली असून एसीबीच्या पथकाने त्‍याला रंगेहाथ पकडल्‍याने खळबळ माजली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, तक्रारदार एका विभागात क्लार्क आहे. त्या क्लार्कची अमरावती येथून जळगावात बदली करण्यात आली. ही बदली आपणचं केल्याने त्यासाठी एक लाख रुपये आपणाला द्यावेत अशी मागणी मंत्रालयातील महसूल विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असलेले ओम प्रकाश यादवने तक्रारदाराला केली. तसेच 

लाच न दिल्यास तुझ्या नोकरीची मी वाट लावेन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी ओमप्रकाशने गुरूवार दि. 24 रोजी आपण जळगावात आल्याचे सांगून तक्रारदारला पुन्हा धमकी दिल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

जळगाव एसीबीचे पोलिस उप अधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी, हवालदार मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर आदींनी सापळा रचुन लाचेची मागणी करताना यादवला अटक केली.