Thu, Jul 02, 2020 17:01होमपेज › Nashik › लॉकअपमध्येच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्‍न

लॉकअपमध्येच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्‍न

Published On: Jan 29 2019 6:17PM | Last Updated: Jan 29 2019 6:21PM
धुळे : प्रतिनिधी 

धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण तेथील गार्डच्या ऐनवेळी हा प्रकार लक्षात आला. त्याने कुलूप उघडून या आरोपीला रोखल्‍याने मोठा अनर्थ टळला. या आरोपीच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुका पोलिस ठाण्यात या आरोपीच्या विरोधात अल्पवयीन मुलीस पळवून तिल्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हयातील भडगाव तालुक्यातील कोडपिंप्री या गावात रहाणारे प्रेमदादा उर्फ विकास राजेंद्र पाटील या तरुणाचे एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम संबंध होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वी या मुलीसह तो घर सोडून निघून गेल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर संबंधीत मुलीसह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी अल्पवयीन असल्याने त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्याला तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. तर संबंधीत मुलीस समुपदेशन करुन तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

यानंतर पाटील हा कमालीचा व्यथीत झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले होते. यावेळी त्याने संधी साधून बनीयनपासून दोरी तयार केली. यानंतर ही दोरी लॉकअपच्या खिडकीच्या लाकडी रीफला बांधून त्‍याला अडकवून फास गळयात टाकून तो खाली बसला. त्याला अशा पध्दतीने बसल्याचे पाहून दिनेश मावची व अन्य कर्मचा-यांना हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी तातडीने कुलूप उघडून त्याला वैदयकीय महाविदयालयाच्या दवाखान्यात दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाल्याने वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळास भेट दिली असून, जखमी पाटील याचा जवाब देखिल तातडीने नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात दिनेश नाईक या पोलिस कर्मचा-याने दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.