होमपेज › Nashik › नगरसेवकांनी साधला अचूक नेम 

नगरसेवकांनी साधला अचूक नेम 

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:18AMसातपूर : वार्ताहर

सातपूर क्लब हाऊस मधील कै. भीष्मराज बाम मेमोरिअल नेमबाजी प्रशिक्षण केंद्रामध्ये एक्सेल टार्गेट नेमबाजी संघटनाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील नगरसेवकांसाठी आयोजित एक दिवसीय नेमबाजी प्रशिक्षण शाळेत अनेक नगरसेवकांनी अचुक नेम साधला.

रविवार (दि.11) रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक भागवत आरोटे, योगेश शेवरे, नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर यांनी उपस्थित राहून नेमबाजी प्रथामिक प्रशिक्षण घेतले. मात्र, या शिबिराला अत्यअल्प नगरसेवकानी उपस्थिती लावली. यावेळी नगरसेविका वर्षा भालेराव यांनी पहिल्यादाच अचूक नेम साधला. तसेच बोलताना नेमबाजी स्पर्धा, व केंद्राच्या प्रसिध्दीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

प्रशिक्षणपूर्ण करणार्‍या नगरसेवकाना एक्सेल टार्गेट नेमबाजी संघटनाच्यावतीने स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. यावेळी कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना नेमबाजी खेळाची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. 

रायफल व पिस्तुल हाताळण्याची माहिती, रचना व नियम देखील यावेळी समजवून सांगण्यात आले. नेमबाजी प्रशिक्षनाचे आयोजन संस्थेच्या सचिव व राष्ट्रीय नेमबाज श्रद्धा नालामवर व प्रशिक्षक मोनाली गोर्‍हे, तेजस्विनी जोशी यांनी केले होते. यावेळी मनीषा राठोड, चिन्मय जोशी, गणेश दराडे, अन्याना भत्रा, अपूर्व पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.